राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट..

राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट..

वेंगुर्ला /-


राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार हे आज तौक्ते वादळाच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यात आले असता सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास गावडे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत यांचे आग्रहाखातर एवढ्या व्यस्त दौऱ्यात त्यांनी आज शनिवारी वेंगुर्ले नगरपरिषदेस धावती भेट दिली.यावेळी त्यांचे स्वागत नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी पुष्पगुच्छ देऊन केले .त्यावेळी नगरसेवक विधाता सावंत यांनी भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांनी नगरपरिषदेच्या कलादालनास भेट देऊन माहिती घेतली व वेंगुर्ला नगरपरिषदेने केलेल्या कामांचे कौतुक केले व केवळ राजकारण न करता चांगल्या कामात काँग्रेस नगरसेवकांचा सक्रिय भाग असल्याने समाधान व्यक्त केले.यावेळी खासदार विनायक राऊत,
आमदार दिपक केसरकर,
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत,गटनेते प्रकाश डिचोलकर,गटनेते सुहास गवंडळकर,नगरसेवक दादा सोकटे, नगरसेविका कृतिका कुबल, नगरसेविका स्नेहल खोबरेकर, अंकुश मलबारी, समीर नागवेकर आदी कायकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..