वेंगुर्ले /-


वेंगुर्ले तालुक्यात २१ व २२ मे रोजी आलेल्या अहवालात एकूण ४० व्यक्तींचे अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ४ व्यक्ती, आडेली १,मठ ५,वेतोरे २,दाभोली २,रेडी १,रेडी हुडावाडी ६,आरवली देऊळवाडी ६,केरवाडी ४,परुळे ६,मातोंड १ व कामळेविर २ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.तसेच २० मे रोजी आलेल्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात ४ व्यक्ती, आडेली १,मठ ७,वेतोरे ६, न्हईचीआड ३,पाल १,दाभोली १,आरवली १,रेडी ४,परुळे १ व केळूस २ असे एकूण ३१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.तालुक्यात आतापर्यंत १८९५ इतक्या कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या असून १५१७ व्यक्ती बऱ्या झाल्या असून कोव्हिड सक्रिय संख्या ३२१ इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page