वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीकडून<br>वेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीकडून
वेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान

वेंगुर्ले /-
वेंगुर्ले येथील कोरोना केअर सेंटरला वेंगुर्ले शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोरोना सेंटर ठिकाणी मोठी वोशिंगमशिन व ५ वोटर केटर (पाणी गरम राहणारी भांडी) याचे वितरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे कौंन्सिल मँनेजमेंट डायरेक्टर अँन्थोनी डिसोझा, जिल्हा डॉक्टर सेलच अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी जिल्हा बँक संचालक नितीन कुबल, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, शहर सचिव स्वप्नील रावळ, कोव्हीड केअर सेंटरचे डॉ. अमोल दुधगांवकर, डॉ. निलेश अटक, कोव्हीड सेंटर मधील कर्मचारी आदी उपस्थित होते.सदर पिण्याचे पाणी गरम ठेवणारे भांडी व वोशिंगमशिन या अत्यावश्यक व महत्वपूर्ण वस्तु कोरोना केअर सेंटरला वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दातृत्वाबद्दल तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी शासनाच्यावतीने वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेस व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..