जिल्ह्यातील तीन न.प.उभारणार सीसीसी सेंटर.;आ रविंद्र चव्हाण, आ लाड यानी दिले ५ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेंटर

जिल्ह्यातील तीन न.प.उभारणार सीसीसी सेंटर.;आ रविंद्र चव्हाण, आ लाड यानी दिले ५ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेंटर

सावंतवाडी /-

कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला या नगरपंचायतीचा माध्यमातून २५ ऑक्सिजन बेडच सीसीसी सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरला प्राथमिक स्वरूपात ५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, भाजप आ. प्रसाद लाड यांचा माध्यमातून हे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महेश धुरी, आनंद नेवगी, मनोज नाईक आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..