तौत्के वादळामुळे झालेल्या व्यापारी तसेच पर्यटन व्यावसायिकांच्या नुकसानीची त्वरित पंचयादी करून आर्थिक मदत द्या.;बाबा मोंडकर

तौत्के वादळामुळे झालेल्या व्यापारी तसेच पर्यटन व्यावसायिकांच्या नुकसानीची त्वरित पंचयादी करून आर्थिक मदत द्या.;बाबा मोंडकर

मालवण /-


तौत्के वादळामुळे जिल्ह्यातील व्यापारी व पर्यटन व्यावसायिकांना प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून आधिच कौरौना व्हायरस मुळे मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्ग आर्थिक द्रुष्टीने अडचणीत आला आहे.
तोत्के वादळामुळे व्यापारी व्यवस्थापनेवर झाडे कोसळून तसेच पावसाचे पाणी दुकानात गेल्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. क्रुषि, न्याहारी निवास व होम स्टे पर्यटन प्रकल्पामध्ये कित्येक झाडे तुटून गेली आहेत कित्येक झाडे उन्मळून पडली आहेत जास्त करून किनारी भागात असलेल्या पर्यटन प्रकल्पात बागायती,इमारतीचा, कंपाऊंड वाँल,छप्पराचें मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसाचे तसेच समुद्राचे पाणी पर्यटन प्रकल्पात शिरून कित्येक इलेक्ट्रिक वस्तू खराब झाल्या आहेत तसेच जलक्रिडेला वापरणाऱ्या होड्यांचे नुकसान झाले आहे या अगोदर झालेल्या क्यार, निसर्ग, फयान वादळा मध्ये किनारपट्टी मध्ये झालेल्या नुकसानीत पर्यटन व्यवसायाकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही योग्य प्रकारे पंचनामा न झाल्यामुळे व्यावसायिकांस काहीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही.
तरी तोत्के वादळामुळे व्यापारी व पर्यटन व्यावसायिकांचे करोडो रुपये नुकसान झाले आहे झालेल्या नुकसान विषयीचा पंचनामा त्वरित करण्याचे आदेश देऊन नुकसान झालेल्या व्यावसायिकांस भरीव आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याधिकारी यांच्या कडे केल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..