वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यात शनिवारी रात्री व आज रविवारी संपूर्ण दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे.मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली.आंबा,काजू कलमे उन्मळून पडली.विद्युत तारा तुटल्याने विजवितरणचेही नुकसान झाले आहे.वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वांनाच फटका बसला.आज झालेल्या नुकसानीत आडेली येथील गंगाराम भिवा मुंडये यांच्या घरावर झाड पडून २५ हजार रुपयांचे नुकसान,दाभोली येथील शशिकांत संभाजी राजापूरकर यांचे पत्रे उडून नुकसान,रावदस येथील अनिल शिवराम चव्हाण यांच्या घरावर झाड पडून नुकसान,म्हापण चव्हाणवाडी येथील नामदेव चव्हाण यांच्या घरावर झाड पडून नुकसान,वेंगुर्ले महाजनवाडी येथील मनिष परब यांच्या घरावर झाड पडून नुकसान,होडावडा येथील मधुकर होडावडेकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान,होडावडा येथील संतोष खानोलकर यांच्या गाडीवर फणसाचे झाड पडून नुकसान,वेंगुर्ले महाजनवाडा येथील नंदकिशोर शिरोडकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान,वजराट पिंपळाचे भरड येथील भगवान कृष्णा राणे व दत्तात्रय कृष्णा राणे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान,नवाबाग येथील आशिष केळुसकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान,आडेली फौजदारवाडी येथील नामदेव धरणे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून ३८ हजार रुपयांचे नुकसान,तुळस कुंभारटेम्ब येथील बापू कुंभार यांच्या घरावर झाड पडून नुकसान,दाभोली दत्तमंदिर येथे झाड पडून नुकसान,आडेली कामळेविर येथील ज्ञानेश्वर रामचंद्र प्रभूखानोलकर यांच्या गुरांचा गोठा व मांगर यावर झाड पडून ६० हजार रुपयांचे नुकसान,आडेली कामळेविर येथील संतोष पेडणेकर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून ७० हजार रुपयांचे नुकसान,आडेली येथील भाग्यश्री तुकाराम धरणे यांचे पत्र्याचे छप्पर उडून ४० हजार रुपयांचे नुकसान,वेंगुर्ले शाळा नं.२ गिरपवाडा शाळेवर वडाचे झाड पडून नुकसान,होडावडा येथील महेंद्र परब यांच्या घरावर झाड पडून अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान,परुळे येथील सुभाष आत्माराम परुळेकर यांच्या घराची कौले,छप्पर उडून ७९०० रुपयांचे नुकसान,चिपी येथील गुंडूपंत सदाशिव आंगचेकर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून ४ हजार रुपयांचे नुकसान,परबवाडा येथील अरुण भोवर यांच्या छपराचे पत्रे उडून नुकसान,कुबलवाडा येथील रेश्मा रमेश कुबल यांच्या घर व मांगर यावर झाड पडून नुकसान,आडेली खुटवळवाडी येथील शेतकरी अशोक शंकर गडेकर यांच्या आंबा काजू कलमांवर आकेशियाची झाडे पडल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा हंगामात पावसाच्या आगमनाने आंबा बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.