तौक्ते चक्री वादळाचा कोकम,काजू,आंबा पिकाला मोठा फटका..

तौक्ते चक्री वादळाचा कोकम,काजू,आंबा पिकाला मोठा फटका..

तौक्ते चक्री वादळासहीत रविवारी कोसळलेल्या अवकाळी पावसाचा कोकम पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.त्याच बरोबर काजू,आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. कुडाळ तालुक्यातील कवठी ,चेंदवन ,निरुखे, वालावल सह ईतर गावात वादळाच्या जोराने नुकसान झाले आहे.परिपक्व कोकमाबरोबर कच्चे कोकम पडून नुकसान झाले आहे. काजू आंबा पिकाबरोबर शेतकरी कोकम पिकाचेही उत्पन्न घेत आहेत.काजू व आंबा पीक अंतीम टप्प्यात आले असून सध्या कोकम पीक चालू होते. काही ठिकाणी कोकम काढण्यात आली होती.मात्र बऱ्याच ठिकाणी कोकम पूर्णतः परिपक्व झाले नसल्याने कोकम काढणे बाकी होते. मात्र रविवारी तौक्ते चक्री वादळासहीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कोकम पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तुफान वादळामुळे परिपक्व कोकमाबरोबर कच्चे कोकम झडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पडलेले कोकम पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत. कोकमाची बी आणि सोल यांना बाजारात मागणो असल्याने अनेक ठिकाणी शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. मात्र ऐन हंगामातच पावसामुळे कोकमाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अभिप्राय द्या..