माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण..

माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण..

कुडाळ /-

राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आला आहे.तसेच आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी नुकतेच माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांला भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला होता. याठिकाणच्या समस्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या होत्या. रुग्णालयांच्या आवश्यकतेनुसार नवीन रुग्णवाहिका व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार रुग्णवाहिका व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आला आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील, डॉ. राहुल गवाणकर, जिल्हा परिषद सदस्य राजू कवीटकर,पंचायत समिती सदस्य सौ मथुरा राऊळ,कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, शिवसेना विभागप्रमुख अजित करमलकर, उपविभाग प्रमुख बापू बागवे,वसोली सरपंच अजित परब,सुधीर राऊळ,रमाकांत धुरी,संजय धुरी, बंड्या कुडतरकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..