कुडाळ /-
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे आज ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्ण वाढत असून ऑक्सीजन बेडची आवश्यकता भासत असल्याने जिल्ह्यात ऑक्सीजन बेड वाढवण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ऑक्सीजन प्लांटचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात येईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, जि. प. गटनेते नागेंद्र परब, शहर प्रमुख संतोष शिरसाट, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळी, डॉ. लींगायत, डॉ. मुक्ता दुधगावकर उपस्थित होते.