ना.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिरवल कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

ना.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिरवल कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कणकवली /-

शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते वितरण राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला देण्यात आला आहे. आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते डॉ. दिक्षा वाघमारे यांच्याकडे हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक,संदेश पटेल,कळसुली विभागप्रमुख वागदे उपसरपंच रुपेश आमडोस्कर, रिमेश चव्हाण,नर्स तेजस्वी राऊळ, गुरुनाथ मेस्त्री उपस्थित होते.

अभिप्राय द्या..