खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून दोडामार्ग नगरपंचायतला मिळाला विशेष निधी.;चंदन गावकर

खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून दोडामार्ग नगरपंचायतला मिळाला विशेष निधी.;चंदन गावकर

दोडामार्ग /-

खासदार विनायक राऊत यांच्या आग्रही मागणीमुळे व विशेष प्रयत्नाने जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत ३ कोटींचा विकासनिधी नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. त्यात कसई – दोडामार्ग नगरपंचायतला ३४.५० लाखाचा विशेष निधी विविध विकास कामासाठी मंजूर झाला आहे. याबाबतची माहिती दोडामार्ग शिवसेना युवा नेते चंदन गांवकर यांनी दिली असून
कसई – दोडामार्ग शहरातील विविध विकास कामासाठी खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे कसई – दोडामार्ग शहराच्या सर्वांगीण विकासात भर पडणार असून यामुळे शहरवासियांतून समाधान व्यक्त होत दिसत आहे. तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी याबद्दल खासदार विनायक राऊत यांचे विशेष आभार माणत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

अभिप्राय द्या..