कणकवलीत लॉकडाऊन सुरू असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कापड दुकानदारावर गुन्हा दाखल..

कणकवलीत लॉकडाऊन सुरू असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कापड दुकानदारावर गुन्हा दाखल..

कणकवली /-

करण्यात आला आहे.कणकवलीतील व्यापाऱ्यांने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असतानाच देखील कणकवली बाजारपेठेत कापड दुकान सुरू ठेवणाऱ्या एका कापड दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असतानाच देखील कणकवली बाजारपेठेत कापड दुकान सुरू ठेवणाऱ्या एका कापड दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठेत मनमंदिर हे कापड दुकान सुरू असल्या बाबत माहिती मिळाल्या नुसार नगरपंचायत पथकाने तपासणी केली असता या कापड व्यावसायिकाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भागीरथ धीराराम प्रजापति याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भा.द.वि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत नगर पंचायत कर्मचारी रमेश कदम यांनी फिर्याद दिली असून, कणकवली नगरपंचायत ने केलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

अभिप्राय द्या..