वेंगुर्लेत आज नव्याने सापडले ४७ कोरोना रुग्ण तर,दोघांचा कोरोना मुळे मृत्यू…

वेंगुर्लेत आज नव्याने सापडले ४७ कोरोना रुग्ण तर,दोघांचा कोरोना मुळे मृत्यू…

वेंगुर्ला /-


वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी आलेल्या अहवालात एकूण ४७ व्यक्तींचे अहवाल कोव्हीड ( कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,तर २ व्यक्तींचा कोव्हिड ( कोरोना) मुळे मृत्यू झाला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आजच्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात ८ व्यक्ती,आरवली ३,न्हईचीआड १,खानोली १,वेतोरे २,मठ ३,हरिचरणगिरी २,परुळे १,पाल १,तुळस ५,शिरोडा १०,रेडी २,म्हापण २,आडेली २,मातोंड १ व परबवाडा ३ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.तर रेडी (वय ६०) व म्हापण (वय ५६) येथील अशा एकूण २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.दरम्यान प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या आवाहनानंतर आज सोमवारी पाचव्या दिवशी वेंगुर्ले शहरात जनता कर्फ्युस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अभिप्राय द्या..