सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे.ते १५ मे.पर्यन्त कडकलॉकडाऊन.;पालकमंत्री उदय सामंत यांची झूमअँपडॉरे घोषणा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे.ते १५ मे.पर्यन्त कडकलॉकडाऊन.;पालकमंत्री उदय सामंत यांची झूमअँपडॉरे घोषणा

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता, सर्वपक्षीयांनी घेतलेल्या निर्णयानुसार पाच दिवसाचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी ९ तारखेला रात्री बारा वाजल्यापासून १५ तारखेपर्यंत करण्यात येईल, याला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. दरम्यान आमच्याकडे ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. येत्या काळात प्लाझ्मा मशीनबरोबर आरटीपीसीआर टेस्ट करणारी व्हॅन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणता येऊ शकेल का?, याबाबत आमचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. श्री सामंत यांनी आज याठिकाणी झूम अॅपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली.

अभिप्राय द्या..