कुडाळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांचा परफेक्ट अकॅडमीकडून कोरोना योध्यानचा सन्मान..

कुडाळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांचा परफेक्ट अकॅडमीकडून कोरोना योध्यानचा सन्मान..

कुडाळ /-

कुडाळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना आज परफेक्ट अकॅडेमी तर्फे N-95 आणि 50 सर्जिकल मास्क, सॅनिटायसर स्टॅन्ड देण्यात आले. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे पी आय शंकर कोरे, जाधव आदी उपस्थित होते.कुडाळ मधील पोलीस निरीक्षक शंकर कोरे हे आपल्या टीम सोबत चांगले काम करत आहेत. अशा वेळी खारीचा का वाटा होईना पण पोलीस सुद्धा सुरक्षित राहिले पाहिजे या साठी ही छोटीशी मदत आपण करत असल्याचे प्रा. परब यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील विद्यार्थ्यांनी प्रथमच परफेक्ट अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश मिळवत आहेत. परफेक्ट अकॅडेमि कडून पंधरा विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवत पहिल्या संधीतच प्रेवेश निश्चित केला आहे.

अभिप्राय द्या..