कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने होणार वाढदिवस साजरा..

वेंगुर्ला /-

प्रतिवर्षाप्रमाणे चालू वर्षी ही श्री देव वेतोबाचा वार्षिक वाढदिवस सोहळा वैशाख शु. पञ्चमी शके १९४३ सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी संपन्न होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षाप्रमानेच चालू वर्षी ही हा वाढदिवस सोहळा येत असल्याने तो साजरा करण्यावर मर्यादा येत आहेत. शासन / प्रशासन स्तरावरून धार्मिक स्थळावरील बंदी जाहीर झाल्यामुळे वाढदिवस सोहळा साजरा करण्यावर मर्यादा येत आहेत दुखः एकच गोष्टीचे वाटते की, चालुवर्षी श्री देव वेतोबाच्या पुनः प्रतिष्ठा सोहळ्यास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. आणि हा रौप्यमोत्सवी वाढदिवस सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा करावा अशी आमची सर्वांची मनोमन इच्छा होती. परंतु कोरोनारुपी जागतिक महामरिमुळे ही इच्छा चालू वर्षी पूर्णत्वास जात नसल्याने आम्हास खूप वाईट वाटत आहे.तरी सुद्धा त्यादिवशी थोडक्यात धार्मिक कार्यक्रम करून श्री देव वेतोबा चे live दर्शन इंटरनेट द्वारे सर्व भक्तांना घरबसल्या मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत तरी सर्व भक्तांनी घरी बसूनच सुरक्षित राहून श्री देव वेतोबा चे दर्शन घेऊया आणि या भूतलावर सुख, शांती आणि समाधान नांदावे अशी श्री देव वेतोबा चरणी प्रार्थना करूया.असे आव्हान वेतोबा देवस्थान अध्यक्ष ,श्री जयवंत बाबुराव राय श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी अरवली यांनी केले आहे.अधिक माहिसाठी संपर्क साधावा.94033 50772

http://vetobadevasthanarawali.com/contact.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page