मालवण /-
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे २५ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत जय जय महाराष्ट्र माझा या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, समाजकारण, राजकारण, क्रीडा, साहित्य, संस्कृती यावर आधारित ३० प्रश्न विचारले जातील. प्रश्न सेवांगण उपक्रम समूह व सेवांगण फेसबुक पेजवर पाठविले जातील. नावनोंदणी व प्रश्नांची उत्तरे दीपक भोगटे (९४२३८३३१६३) या क्रमांकावर पाठवावीत. नावनोंदणी २० एप्रिल पर्यंत करावी. यशस्वी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्रे दिली जातील. तसेच प्रथम तीन क्रमाकांच्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येईल. बक्षीस वितरण समारंभ १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.