दोडामार्ग /-
स्त्री ही जगत-जननी असते असे मानत शिरंगे पुनर्वसन गावातील महिलांनी सामाजिक संदेश देत साजरा केला जागतिक महिला दिन,आजची स्त्री ही अबला नारी नसून ती सबला नारी झाली आहे. आजच्या स्त्री ची ओळख आधुनिक स्त्री अशी व्हावी यासाठी त्यांनी अनेक संदेश देत स्त्री ची ओळख पटवून दिली तसेच स्त्री ही मुलगी,बहिण, बायको,माता अशी अनेक रूपे घेत संसाररूपी जीवनात आपले कर्तव्य सक्षमरीत्या बजावत असते त्यातच चालू असलेल्या कोरोना सारख्या महामारीत अनेक कोरोना योद्धांचे महत्वाचे योगदान लाभले असून कोरोना योद्धांचे कार्य महत्वाचे मानत महिला दिनाचे अवचित्य साधून शिरंगे पुनर्वसन गावातील महिलांनी कोरोना योद्धांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देत सत्कार देखील करण्यात केला, स्त्री चे महत्व पटवून देण्याबरोबरच आपले संसाररुपी जीवन कसे सुखी करायचे व एकत्रितरित्या स्वतंत्रमय जीवन कसे जगायचे हे देखील पटवून दिले कार्यक्रमा दरम्यान कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन देखील करण्यात आले यावेळी गावातील आशा सेविका तन्वी गवस,अंगणवाडी सेविका सुष्मा नाईक, ग्रामसेविका जगताप,आरोग्यसेविका नंदा ठाकर,आरोग्य सेवक तळकर,आरोग्य सेविका दिशा कोरगावकर, नीता शेटये,सिंधुदुर्ग जिल्हा आय.सी.टी शिक्षक संघटना सचिव प्रशांत गवस, सामाजिक कार्यकर्ते संजय गवस,उपसरपंच लवु गवस, सदस्य भिकाजी कदम, सुनीता नाईक, सिता गवस,वैशाली घाडी, दीक्षा गवस, प्रदीप नाईक, तसेच असंख्य महिला देखील उपस्थित होत्या.