वैभववाडी /-
सोनाळी बौध्दवाडी येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पती गिरीश संजय भोसले यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आपले लग्न अंकिता भोसले हीच्या बरोबर सन 2015 मध्ये झाले. गेली काही वर्षे अंकिता घर कामानिमित्त मुंबईला होती. ती ऑक्टोबर महिन्यात गावी आली होती. परत ती घर कामाला मुंबईला गेली. गेले दोन महीने तिच्या दोन्ही मोबाईल वरती आम्ही वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. तिची सर्वत्र शोधाशोध केली. तरी सापडली नाही. असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.