जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ला भाजपा महिला पाककृती स्पर्धा व फ्रूट सॅलेड डेकोरेशन व फ्रूट कार्व्हींग स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद –

जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ला भाजपा महिला पाककृती स्पर्धा व फ्रूट सॅलेड डेकोरेशन व फ्रूट कार्व्हींग स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद –

वेंगुर्ला /-

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ले च्या वतीने दिनांक ७ मार्च व ८ मार्च रोजी साईमंगल कार्यालय मध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी पाककृतींची स्पर्धा व फ्रूट सॅलेड डेकोरेशन व फ्रूट कार्व्हींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील ४० महिला सहभागी झाल्या .कोव्हीड १९ (कोरोना) च्या पार्श्वभूमीवर सरकारी सर्व नियमांचे पालन करून स्पर्धेचे आयोजन केले होते .तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सामाजिक बांधिलकी म्हणून हँडवाॅशचे वाटप करण्यात आले .तसेच कार्यक्रमामध्ये कोरोना बाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली .यावेळी व्यासपीठावर महिला तालुका अध्यक्षा तथा माजी उपसभापती स्मिता दामले , जिल्हा चिटनीस ऍड. सुषमा खानोलकर , महिला जि.सरचिटणीस सारिका काळसेकर , पं. स. सदस्या गौरवी मडवळ , नगरसेविका शितल आंगचेकर ,साक्षी पेडणेकर , श्रेया मयेकर , कृपा मोंडकर , महिला ता.सरचिटणीस वृंदा गवंडळकर , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर ,ऋतुजा मेस्त्री , हसीना बेन मकानदार , अंकिता देसाई , संध्या गावडे , रीया केरकर , कृतिका साटेलकर , स्मिता कोयंडे तसेच तालुकास्तरावरील महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होत्या .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका शितल आंगचेकर यांनी केले . तसेच स्पर्धेचे परीक्षण श्रद्धा गोरे व सौ.नाईक यांनी केले.या शाकाहारी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – १००० रु.व भेटवस्तू – अंजली गोरे,
द्वितीय क्रमांक – ७५० रु.व भेटवस्तू – यशस्वी मराठे,
तृतीय क्रमांक – ५०० रु. व भेटवस्तू – श्रृती गिरप,
उत्तेजनार्थ- पुजा म्हापणकर, रीया केरकर, सुजाता मराठे इत्यादींना आणि
फ्रुट सॅलेड व फ्रूट कार्व्हींग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – १००० रु. व भेटवस्तू – यशस्वी मराठे,द्वितीय क्रमांक- ७५० रु. व भेटवस्तू – साक्षी नार्वेकर,तृतीय क्रमांक – ५०० रु. व भेटवस्तू – रीया केरकर इत्यादींना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

अभिप्राय द्या..