कणकवलीत लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्सचे वाढीव बांधकाम कोसळून कामगाराचा तुटला हात.;कामगाराची प्रकृती गंभीर

कणकवलीत लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्सचे वाढीव बांधकाम कोसळून कामगाराचा तुटला हात.;कामगाराची प्रकृती गंभीर

कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील घटना..

कणकवली /-

कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स चे वाढीव बांधकाम सुरू असताना बांधकाम कोसळून कामगाराचा हात कोपरापासून तुटला.कणकवली शहरातील पटवर्धन चौकात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी डेव्हलप केलेली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स ही कमर्शिअल बिल्डिंग आहे.या इमारतीत नव्याने वाढीव बांधकाम सुरू असतानाच बांधकाम कोसळून एका कामगाराचा हात कोपरापासून तुटून पडला.तर आणखी काही कामगारांना दुखापत झाली आहे.जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हात तुटलेल्या कामगाराची प्रकृती गंभीर आहे.

अभिप्राय द्या..