परुळेत रक्तदान शिबिराचे आयोजन

परुळेत रक्तदान शिबिराचे आयोजन

परुळे /-

ग्रामपंचायत परुळेबाजार ,महालक्ष्मी वाचनालय व ग्रंथसंग्रहालय परुळे तसेच सिंधू रक्त मित्र संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने परुळेबाजार ग्रा पं येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कोव्हिडं 19 च्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी विविध संस्था मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे परुळे गावात आतापर्यंत दोन संस्थानी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ग्रामपंचायत परुळेबाजार येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन सरपंच श्वेता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिंधू रक्त मित्र चे प्रकाश तेंडोलकर डॉ ,बावणे माजी सरपंच प्रदीप प्रभू महालक्ष्मी वाचनालय अध्यक्ष विजय तुळसकर व ग्रामसेवक शरद शिंदे ग्रा पं सदस्य सुनील चव्हाण अदिती परुळेकर आदींसह लीलाधर सोमजी मनोज दुदवडकर व वाचनालय चे सदस्य व ग्रामस्थ रक्तदाते उपस्थित होते प्रास्थाविक व सूत्रसंचालन प्रथमेश नाईक यांनी केले

अभिप्राय द्या..