सावंतवाडी शहरात न्यू खासकिलवाडा परिसरात मोबाईल टॉवर उभारण्यास मनसेचा विरोध.;आशिष सुभेदार

सावंतवाडी शहरात न्यू खासकिलवाडा परिसरात मोबाईल टॉवर उभारण्यास मनसेचा विरोध.;आशिष सुभेदार

सावंतवाडी /-

शहरात न्यू खासकिलवाडा परिसरात रसाळ मेस जवळ कॉसमॉस बिल्डिंग येथे इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात येऊ नये. अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. या परिसरात लोकवस्ती असून, लहान मुलांची शाळा देखील आहे. त्यामुळे ठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवरमुळे लोकांच्या, लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होणार असल्याची भिती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या विरोधासोबत मनसेचा देखील त्याला विरोध असून तरीदेखील त्या ठिकाणी टॉवर उभारण्यात प्रयत्न केला तर त्या टॉवर विरोधात खळखट्याक करू, असा इशारा मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे. मनसे पक्ष हा स्थानिक जनतेसोबत असून नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तो टॉवर उभारू देणार नाही, असेही आशिष सुभेदार यांनी स्पष्ट केले.

अभिप्राय द्या..