कणकवली /-
मोदी सरकारने शेतकऱ्याना ताकद देणारे क्रांतिकारी कृषी विधेयक संमत केले आहे. या विधेयकाला बळ देण्यासाठी कोकणातून पहिल्यांदाच ट्रॅक्टर रॅली निघाली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कृषी विधेयकामुळे शेतकऱ्याच्या घरात आर्थिक समृद्धी येणार आहे,. देवगडचा आंबा उत्तरप्रदेशात विकला जाऊ शकेल. दोडामार्गचा काजू मध्यप्रदेशात मिळेल ही कृषी विधेयकाची ताकद आहे. दिल्लीच्या सिंध बॉर्डरवर राष्ट्रीय काँग्रेस फक्त गैरसमज पसरवून कृषी विधेयकाबद्दल अफवा पसरवत असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात देवगडचा आंबा बिग बाजार, डी मार्ट, महिंद्रा बाजार मध्ये आम्ही उपलब्ध करून दिला. त्याचा फायदा येथील आंबा बागायतदाराला झाला. हीच या कृषी विधेयकाची ताकद आहे. म्हणूनच कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.