चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्नशील.;सुरेश प्रभू

चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्नशील.;सुरेश प्रभू

वेंगुर्ला /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ व्हावे ही जनतेची इच्छा होती.मी नागरी उड्डाणमंत्री असताना केंद्र सरकारच्या विविध परवानग्या आपल्या कार्यकाळात दिल्या गेल्याने आज हे सर्व शक्य आहे.चिपी
विमानतळ लवकरच पूर्ण व्हावे,यासाठी वरिष्ठ स्तरावर आपले प्रयत्न सुरूच आहेत.राज्य सरकारच्या सहकार्याने विमानतळ लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी चिपी येथे व्यक्त केला.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी आज वेंगुर्ला तालुक्यातील
चिपी विमानतळ येथे भेट देऊन बैठक घेऊन चर्चा केली.सर्वप्रथम सुरेश प्रभू यांचे भाजपच्या वतीने व श्वेता चव्हाण यानी स्वागत करण्यात आले.व्यासपीठावर सौ.उमा प्रभू,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,परुळेबाजार सरपंच श्वेता चव्हाण,आर.बी.आय.चे पदाधिकारी अमर पाटील,सकपाळ,माजी सभापती निलेश सामंत,भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,योगेश प्रभू,कुशेवाडा ग्रा.प.उपसरपंच निलेश सामंत,
मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर,किसान मोर्चाचे बाळु प्रभु,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर,म्हापण माजी सरपंच गुरुनाथ मडवळ,परुळेबाजार माजी सरपंच प्रदीप प्रभू,माजी चेअरमन प्रकाश राणे,संजय परब,गुरुप्रसाद चव्हाण,म्हापण ग्रा.प.संजोग परब,चव्हाण,
कुशेवाडा ग्रा.प.सदस्य रुपेश राणे,चिपी ग्रा.प.सदस्य धनश्री चव्हाण,परुळे ग्रा.प.
सदस्य सुनिल चव्हाण,भोगवेचे जयेश सामंत,गौरव आरोलकर आदींसह पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,विमानतळ व पर्यटन यांचे यांचे नाते असून पर्यटनास वाव आहे.याबाबत वीज,पाणी व अन्य आवश्यक असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करा,अशा सूचना देताना त्यांनी लवकरात लवकर विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास चिपी येथे व्यक्त केला.पर्यटन वाढीचा आराखडा तयार करण्यात आला असून पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत,असे
सांगताना त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचाही विशेष उल्लेख केला.
यानंतर त्यांचा वेंगुर्ले येथे नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी त्यांचे स्वागत केले.तद्नंतर त्यांनी आरवली श्री देव वेतोबा मंदिर येथे थांबून दर्शन घेतले.येथे त्यांचे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी स्वागत केले.यावेळी आरवली देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय तसेच ग्रामस्थ ,मयूर आरोलकर,रिमा मेस्त्री,ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांनतर प्रभू
यांनी शिरोडा ग्रामपंचायत येथे भेट देऊन चर्चा केली.यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी स्वागत केले.यावेळी उपसरपंच रवि पेडणेकर, ग्रा.प.सदस्य ,रेडी सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे,ग्रा.प.
सदस्य ,ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने राष्ट्रपिता गांधी स्मारक,मच्छिमारना पेट्रोल सबसिडी व पर्यटन विकासातुन शिरोडा वेळागर बिचचे
रोजगार दृष्टीने नियोजन आदी बाबत निवेदन देण्यात आले.तसेच रेडी ग्रा.प
च्या वतीने टाटा मेटॅलिक च्या जागेत नवीन प्रकल्प व्हावा,तलाव सुशोभिकरण
याबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी आजच्या दौऱ्यात भाजपा पदाधिकारी,वेंगुर्ले नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..