चोरट्यांनी भर वस्तीमधील तीन दिवसात चार दुकाने फोडल्यामुळे कुडाळ शहरात खळबळ..

चोरट्यांनी भर वस्तीमधील तीन दिवसात चार दुकाने फोडल्यामुळे कुडाळ शहरात खळबळ..

कुडाळ/-
कुडाळ शहरातील आंबेडकर डॉ.बाबासाहेब पुतळा परिसरातील तीन दुकाने अज्ञात चोरट्याने फोडली.मात्र या तीनही दुकानामध्ये किरकोळ रक्कम सोडून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना असुन कुडाळ शहरात चोर्‍यांची मालिका सुरू झाली असुन हे चोरटे सराईत असल्याचे बोलले जात आहे.आंबेडकर पुतळ्या नजिकच्या एका हार्डवेअरच्या दुकानात चोरट्याने पत्र्यावर दगड मारून पत्रा फोडुन आतमध्ये प्रवेश केला.यावेळी चोरट्यांना फारसे काही हाती लागले नाही.त्यामुळे त्यांनी किरकोळ रक्कम व एक वजनी काटा चोरून नेला.तर त्याच्या लगत असलेल्या एका किराणा मालाच्या दुकानातही पत्रा वर उचलुन आत प्रवेश केला.मात्र या चोरट्यांना या दुकानातही अगदी किरकोळ रक्कम वगळता हाती काहीच लागले नाही.त्यामुळे या दोन दुकानाच्या मधील तिसर्‍या दुकानातही या चोरट्यांनी प्रवेश केला.मात्र हे दुकान एक गोडावुन असल्याने चोरट्यांना आतमध्ये काहीच मिळाले नाही. तीनही दुकानांमध्ये या चोरट्यांनी पाठीमागील बाजुने प्रवेश केला.गेल्या दोन दिवसापुर्वी शहरातील एका कापड दुकानामध्येही या चोरट्यांनी प्रवेश केला.या दुकानातील काही किरकोळ रक्कम व कपडे या चोरट्याने चोरून नेले, या चोरट्याचे चित्र एका सीसीटीव्ही कॅमेरॅमध्ये कैद झाले आहे.मात्र या चोर्‍यांमध्ये गेलेली रक्कम किरकोळ असल्याने या चोर्‍यांची नोंद पोलिस स्थानकात नव्हती.भर वस्तीमधील तीन दिवसात चार दुकाने फोडल्यामुळे कुडाळ शहरात खळबळ उडाली आहे. कुडाळ शहरात रात्री दोन वाजेपर्यंत काही नागरीकांची वर्दळ असते. त्यामुळे हे चोरटे दुकानाच्या मागील बाजुने आत मध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे ते कोणाच्याही दृष्टीस पडत नाहीत. मात्र या चोरट्यांना लगाम लावण्यासाठी पोलिस यंत्रणेने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शहरातील नागरीक व व्यापारी वर्गातुन करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..