कुडाळ /-
कोरोना नियमांचे पालन करून शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे आवाहन
कुडाळ येथील जिजामाता चौक येथे असलेली राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या नूतन प्रतिमेचे काम शिवप्रेमी सिंधुदुर्ग या संघटनेने काही महिन्यांपूर्वी हाती घेतले होते.हे काम आता पूर्णत्वास आले असून,येथे स्थापना करण्यात आलेल्या नूतन मूर्तीचा अनावरण सोहळा मंगळावर दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनी करण्याचे योजिले असून, यावेळी कुडाळ येथील प्रतिष्ठित नागरिक देवदत्त नाडकर्णी यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे.तरी या शुभ प्रसंगी शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवप्रेमी सिंधुदुर्ग,संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी उपस्थित राहताना कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.