कुडाळ /-

परिवहन मंत्र्यांनी ऑनलाईन कुडाळ एस.टी. स्टॅन्डचे उद्घाटन घाईगडबडीने करुन संपुर्ण कुडाळ वासियांना तसेच स्टॅन्डवर येणाऱ्या जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील प्रवाशांना उघड्यावर पाडले आहे. घाईगडबडीने ऑनलाईन उद्घाटन करून परिवहन मंत्र्यांनी काय सादले आहे. हे त्यांच त्यांनाच माहीती? ऑनलाईन स्टॅन्डचे उद्घाटन करून परिवहन मंत्र्यांनी कुडाळ जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याचे टाळले आहे, पण भविष्यात सिंधुदुर्ग जनता ह्यांचा समाचार घेतल्या शिवाय राहणार नाही,सुरक्षाभित नसलेले तसेच उपहारगृह व अनेक गोष्टी सुरु नसताना अर्धवट असलेल्या एस.टी. स्टॅन्डचे उद्घाटन का केले ? असलेले जूने एस.टी. स्टॅन्ड तोडून आमदारांना घड्याळ लावायच्या बालहट्टापाई २ कोटीची इमारत बांधली गेली का? कुडाळची शोभा ही घड्याळ लावून वाढणारी नसून कुडाळ- मालवण मध्ये आपल्या कार्यक्षेत्रात रस्ते निट ठेवण्यामध्येच आहे. कुडाळ शहरामध्ये अनेक कामे अशीच अर्धवट ठेवली गेली असून त्या त्या ठिकाणी अशी कधीही बंद पडणारी घड्याळ लावून कुडाळच्या सौंदर्यात भर पडणारी आहे का? फक्त स्वार्थासाठी कुडाळचे खरे सौंदर्य असणार जुना एस.टी. स्टॅन्ड जमीन दोस्त करण्यात आला आहे.भविष्यात ज्या ज्या लोकांनी सदर बांधकामामध्ये भ्रष्टाचार केला आहे त्या त्या लोकांना महाराष्ट्र कामगार परिवहन सेना योग्य जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.असा आरोप मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे उपाध्यक्ष जे.डी.उर्फ बनी नाडकर्णी यांनी आज मीडियाशी बोलताना टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page