कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज शनीवारी दिनाक २६ डिसेंबर रोजी दिव सभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा ०१ सक्रिय रुग्ण सापडला आहे.सापडलेला १ रुग्ण हा कुडाळ तालुक्यातील आणावं येथील आहे, असा कुडाळ तालुक्यात आज ऐकून ०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५५४ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५३४ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत. तर सध्या २० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. आता तालुक्यात एकूण रुग्ण १३२८ एवढे रुग्ण बरे झालेत,तर १२६९ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १७ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०३ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ३९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.