मालवण /-
शहरातील देऊळवाडा येथील उताराच्या रस्त्यावर पर्यटकांच्या क्वालिस गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथून त्याला अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले. हा अपघात आज सायंकाळी घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुंभारमाठ येथील एक तरुण आपल्या दुचाकीने सायंकाळी शहरात येत होता. याचवेळी मालवणच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील चालक गाडीच्या खाली अडकल्याने त्याला गाडीने बरेच अंतर फरफटत नेले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्या तरुणास गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले.