मुंबई येथील महिलेचा 9 महिन्यांपूर्वी रेल्वे प्रवासात विनयभंग केला होता..

वैभववाडी /-

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 9 महिन्यानंतर वैभववाडी पोलीसांनी अटक केली .संशयित आरोपी रोहन शेट्टी वय 32 रा. ठाणे कोपरी गांधीनगर असे नाव आहे.ही घटना 24 फेब्रुवारी 2020 रोजी नांदगाव ते वैभववाडी दरम्यान घडली होती.
या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिसांनी केला.संशयित आरोपी रोहन शेट्टी याला कोपरी ,ठाणे येथून शुक्रवारी 25 डिसेंबर रोजी रात्री उशीरा ताब्यात घेतले.त्यानंतर त्याला ठाणेतून वैभववाडी पोलीस स्टेशन येथे आणले. रात्री 1 वाजता वैभववाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. शनिवारी त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले न्यायलयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.24 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेस रेल्वेमधून सदर महिला प्रवास करत होती. नांदगाव ते वैभववाडी स्टेशनच्या दरम्यान संशयित आरोपी रोहन शेट्टी याने त्या महिलेची छेडछाड करत विनयभंग केला होता.याबाबतची तक्रार फिर्यादी महिलेने ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनला केली होती.त्यानंतर हा गुन्हा ठाणे पोलीसांनी वैभववाडी पोलिसांकडे सोपविण्यात आला.वैभववाडी पोलिसांनी याचा तपास 24 फेब्रुवारी 2020 च्या मुंबईकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा रेल्वे बोगीतील आरक्षित केलेल्या प्रवाशांची माहिती वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी रत्नागिरी रेल्वे कार्यालय कडून घेतली.यामध्ये त्यांना संशयित आरोपी असल्याचे निसपन्न झाले.
वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये 21 डिसेंबर रोजी ऑनलाईन फिर्याद दाखल करण्यात आली.त्यानंतर अवघ्या 3 दिवसांत वैभववाडी पोलिसांनी खातर जमा करून सर्व पुरावे गोळा करून 25 डिसेंबर रोजी मध्यरात्री त्या तरुणाला कोपरी ठाणे येथून त्याच्या ताब्यात घेतले.सदर घटना ही वैभववाडी हद्दीत घडल्याने त्याचा तपास वैभववाडी पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. गुरुवार दि. 24 डिसेंबर रोजी एएसआय रविकांत अडुळकर, पोलीस नाईक अभिजीत तावडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांचे पथक ठाणे कोपरी येथे पोहचले. या पथकाने आरोपी रोहन शेट्टी याला स्थानिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी रात्री आरोपी रोहन शेट्टी याला पोलिसांनी वैभववाडीत आणले. रात्री 1 वाजता त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार संगीता अडुळकर करत आहेत.वैभववाडी पोलिसांच्या या कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

महिलेचा विनयभंग 24 फेब्रुवारी 2020 रोजी घडला.पीडित महिलेने 25 फेब्रुवारी रोजी ठाणे पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपी विरोधात फिर्याद दिली होती.मात्र रेल्वे कार्यालय कडून 9 महिन्यानंतर 21 डिसेंबर रोजी ऑनलाईन तक्रार वैभववाडी पोलीस स्टेशनला मिळाली.त्यानंतर 3 दिवसात संशयित आरोपीच्या मुसक्या वैभववाडी पोलिसांनी आवळल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page