कुडाळ बस स्थानक नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले काँरंटाईन करण्यात आले कर्मचारी यांची लोकवस्ती पासून दूर प्रशस्त हॉलमध्ये सोय करण्यात यावी अशी मागणी नागरसे तथा कुडाळ भाजप शहर अध्यक्ष राकेश कांदे वाहतुक नियंत्रक रसाळ यांच्याजवळ केली आहे.कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना याबाबत एसटी प्रशासनाकडून कोणतीही कल्पना दिलेली नाही.
तसेच कुडाळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला बस्थानक प्रशासन जबाबदार असेल राकेश कांदे यांचा आरोप केला आहे. कुडाळ नव्याने बांधण्यात आलेल्या बस स्थानक इमारतीच्या ठिकाणी बस स्थानक कर्मचाऱ्यांना काँरंटाईन करण्यात आले होते सदर ठिकाणी लोकवस्तीच्या ठिकाणी बसस्थानकामध्ये अपुरी सोय असताना काँरंटाईन करणे हे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टीने नागरिकांच्या धोक्याचे होते.
त्या कर्मचाऱ्यांना बाहेर बस स्थानकाच्या वरच्या मजल्यावर बघताच कुडाळ शहरातील येथील परिसरातील नागरिकांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कांदे यांनी यासंबंधी कुडाळ बस स्थानकाचे चे नियंत्रक श्री डोंगरे आणि जिल्ह्याचे श्री रसाळ साहेब यांच्याशी चर्चा केली व सदर कर्मचाऱ्यांना लोकवस्ती मध्ये न ठेवता लोकवस्तीपासून दूर त्यांची प्रशस्त हॉलमध्ये व्यवस्था करावी या संबंधित दूरध्वनीवरून चर्चा केली कारण कुडाळ नुतन बस स्थानक इमारतीमध्ये सदर कर्मचाऱ्यांना काँरंटाईन केले तरीही त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी त्यांना बसस्थानकाच्या बसमधून हायवे येथील नवीन कुडाळ डेपो येथे जावे लागते, शिवाय नवीन इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारची त्यांना सुविधा उपलब्ध नव्हती नवीन बांधण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ठेवण्याबाबत कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकार्यांना कोणतीही कल्पना बसस्थानकाच्या यंत्रणेने दिलेली नव्हती याबाबत नगरपंचायत चे मुख्याधिकारी गाढवे साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून नगरसेवक राकेश कांदे यांनी चर्चा केली आणि सदर कर्मचाऱ्यांना लोकवस्तीपासून इतर ठिकाणी प्रशस्त हॉलमध्ये त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांची सोय करण्यात यावी अशी मागणी राकेश कांदे यांनी बस स्थानकाच्या प्रशासनाच्या प्रमुखांकडे केली. संबंधित गोष्टीची तातडीने दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवू असे कांदे यांनी मीडिया शी बोलताना सांगितले.