कुडाळ /-
नेरूर येथे उदय दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत,भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.तरी या रक्तदान शिबीरास रक्तदान, श्रेष्ठ दान समजून रक्त दात्याना एक विनम्र आवाहन करण्यात येत आहे की, संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशावेळी सामाजिक कार्यासाठी एक पाऊल पुढे येऊन आमच्या “ओम शिवकृपा कला-क्रीडा मंडळ, नेरुर” च्या वतीने उद्या शनिवारी, होणाऱ्या रक्तदान शिबिरास सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत हाॅल नेरुर, तालुका-कुडाळ येथे रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तादात्यांनी यात सहभागी होऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती.असे आवाहन ओम शिवकृपा कला-क्रीडा मंडळ, नेरुर” यांच्या वतीने श्री. मंजुनाथ सुभाष फडके यांनी केले आहे.