चेंदवण वेलवाडी येथील विनायक बखले यांच्या घरी चोरी केल्या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

चेंदवण वेलवाडी येथील विनायक बखले यांच्या घरी चोरी केल्या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

 

कुडाळ /-

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चेंदवण वेलवाडी येथील विनायक महादेव बखले वय- ७३ हे आपल्या घर व घरपरिसरातील साफसफाईचे काम करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील २९ हजार रोख रक्कम चोरून नेली ही घटना १२ डिसेंबर रोजी घडली.

चेंदवण वेलवाडी येथील विनायक महादेव बखले यांचे घर चेंदवण येथे असून ते या ठिकाणी घरात एकटेच राहातात.बखले हे मुंबई येथे जावून येवून असतात. नोव्हेंबर महिन्यात ते मुलाकडे मुंबई येथे जाऊन आल्यावर ०१ डिसेंबर रोजी गांवी आले होते. मुंबई येथून गांवी येताना त्यांनी आपले अभ्युदय बँक या बँकेमधील असलेले फिक्स डिपॉझीट रक्कम रूपये पन्नास हजार काढून रक्कम घेवून गांवी आले होते .या रक्कमेतील रूपये दोन हजार पाचशे रुपये मेस्त्री कामाचे दिले. व इतर रक्कम ४७,५००/- पाचशे रूपयाच्या ९५ नोटा घरातील लोखंडी कपाटात ठेवल्या होत्या सध्या ते गांवी एकटेच असल्याने नविन घर बंद करून त्यांच्या जुन्या मूळ घरी झोपायला जातात.१२ डिसेंबर रोजी ४ वा.हे पैसे मोजून खात्री केली होती. नंतर ५ वा घरात साफसफाईचे काम करून झाल्यावर घरातील खोलीतील असलेल्या कपाटातील ठेवलेले पैसे पहाण्यास गेले असता त्यांना पैशाचे बंडल कमी वाटल्याने त्यांनी खात्री केली यावेळी त्यातील २९ हजार रू. कोणीतरी चोरून चोरट्याने नेल्याची खात्री झाली. यानंतर त्यांनी आजुबाजुला या पैशाबाबत चौकशी केली असता माझे पैसे कोणी तरी चोरले हे त्यांच्या लक्षात आले यानंतर त्यांनी कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीचे इराद्याने एकुण ४७५०० रुपये पैकी २९००० रुपये रक्कम घराचा दरवाचा उघडा असतांना चोरून नेलेली असल्याने अज्ञात चोरट्या विरूद्ध तक्रार दिली आहे.यावरून पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..