कुडाळ तालुक्यातील वालावल येथील कर्ली खाडी पात्रात युवकाने उडी मारल्याचा वृत्ताने गावात एकच खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युवकांचा शोध सुरू आहे. परंतु, नदीला भरती असल्याने या शोध कार्यात अडथळा निर्माण होत असून, स्कुबा डायव्हिंग पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या युवकाचे नाव अनिकेत सुभाष कोचरेकर (वय २५ वर्ष, रा. कोचरेकरवाडी, वालावल) असे आहे. ही घटना आज सकाळी ८ ते ९ च्या दरम्याने घडली आहे. खाडीपात्रात त्या युवकाच्या कुटुंबाकडून आणि ग्रामस्थांकडून कसून शोध सुरू असून, स्कुबा डायव्हिंग पथकाला पाचारण करून देखील अद्याप ते पथक घटनास्थळी दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.