आंबेरी ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्याचे खड्डे..

आंबेरी ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्याचे खड्डे..

 

 

कुडाळ /-

खोऱ्यातील आंबेरी तिठा ते घावनळे फाटा पर्यंतचा अंदाजे १.५ किमी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.रत्यांची अक्ष:रक्षा पुर्णपणे चाळण झाली होती. गणेश चतुर्थीच्या पूर्वीपासून संबंधित विभागाला वेळोवेळी निदर्शनास आणून याकडे मात्र पुर्णपणे दुर्लक्ष करत होते.संबधित विभागाला जाग तरी कधी येणार हा प्रश्न मात्र तेथील ग्रामस्थांना पडला आहे.येथील आज आंबेरी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरील सर्व खड्डे पुर्णपणे बुजविले. सर्व वाहनधारकांमधून याबाबत समाधान व्यक्त केल जात आहे.

यावेळी आंबेरी पोलिस पाटील संतोष म्हाडगुत, मोहन म्हाडगुत, चेतन म्हाडगुत, अरुण तोरसकर,अनिश म्हाडगुत, कल्पेश म्हाडगुत, सुभाष म्हाडगुत,सुदर्शन म्हाडगुत यांच्यासह इतरही ग्रामस्थ उपस्थीत होते.

अभिप्राय द्या..