आचरा–अर्जुन बापर्डेकर,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा विशेष कार्यक्रम नुकताच जि.प. प्राथमीक शाळा, आचरे
येथे साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे सुरेश ठाकूर होते.
शुभारंभाला शाळेतील मुलांनी ‘किराते कुराण’ पठण केले. त्यानंतर “खरा तो एकची धर्म” ही साने गुरुजींची प्रार्थना मुलांनी सुस्वरात गायली. साने गुरुजी कथामालेच्या फलकाचे उद्घाटन कथामाला कार्यकर्त्या श्रीम. आस्मा अशफाक मुजावर यांच्या शुभहस्ते झाले. त्यानंतर मुलांनी उर्दूतून कथाकथन आणि समूह गान सादर केले. त्यानंतर सुरेश शामराव ठाकूर यांनी कथा कशा कथन कराव्यात याविषयीचे मार्गदर्शन केले. मुलांना कथाकथन केले. मनोरंजनात्मक विविध खेळ घेतले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक निसार युनुस सोलकर आणि सय्यद मुश्ताक सय्यद मुसा या शिक्षकांनी केले.
या कार्यक्रमाला श्रीम. अजहरून्निसा सोलकर, जुलेखा अजीम आगा, तबस्सूम साजिद मुजावर, नाझिया सलीम खान, तन्जिल शकील शेख आणि पालक, विद्यार्थी उपस्थित होते.