सावंतवाडी /-
जिल्ह्यातील JEE आणि NEET या परीक्षासाठी अव्वल मानल्या जाणाऱ्या परफेक्ट अकॅडेमी कुडाळ आयोजित ‘NEET’ सराव परीक्षा आज दि.10 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.
सिंधुदुर्ग आणि गोवा येथील विद्यार्थ्यांना येत्या १७ जुलै रोजी होणाऱ्या नीट परीक्षेचा सराव व्हावा यासाठी परफेक्ट अकॅडेमी कडून, कुडाळ आणि सावंतवाडी या केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली. सदर परीक्षेला कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, वैभववाडी येथील 60 हून अधिक विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.
कोरोना काळात बऱ्याच विद्यार्थ्यांची म्हणावी तशी तयारी झाली नाही, कित्येक विद्यार्थ्यांना तर नीट चे कोचिंग देखील मिळाले नाहीत.
पण यामुळे विदयार्थ्यांना योग्य यश मिळाले नाही तर त्यांनी खचून जाऊ नये. कारण प्रत्येकाला दुसरी संधी आयुष्यात मिळणं फार गरजेचं आहे. याचाच विचार करून परफेक्ट अकॅडेमी येत्या २१ जुलै पासून घेऊन येत आहे, नीट रिपीटर बॅच -2022-23.
आता एका वर्षात विदयार्थ्यांना या निमित्ताने संपूर्ण नीट च्या अभ्यासक्रमसहित परिपूर्ण तयारी करता येणार आहे.
तरी नीट रिपीटर बचबद्दल अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परफेक्ट अकॅडेमी करत आहे.
+918830553370/
+9196043175601
