कुडाळ/-

आषाढी एकादशीनिमित्त श्री.देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटी,बाजारपेठ कुडाळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.सलग 10 वर्ष हा भजन स्पर्धेचा कार्यक्रम होत आहे. आज स्पर्धेचा 7 वा दिवस. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.एकाहून एक सरस भजनांनी रसिकांची मने जिंकली. परिसरातील नामांकित भजन मंडळींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. भजनांचा रसास्वाद घेण्यासाठी शहरवासियांची पावले मारुती मंदिराकडे वळत होती. आषाढी एकादशीचा अपूर्व उत्साह शहरवासियांत दिसून आला. आजच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर श्रीमती आशा वर्दम, सौ देविका बांदेकर, माने जी क्रिएशन संस्थापक प्रदीप माने, महिला काँग्रेस शहराध्यक्ष शुभांगी काळसेकर, सौ सोनल सावंत, श्री सुनील धुरी, पत्रकार राजन नाईक, सुधार समितीचे प्रसाद शिरसाट, गौतम शिरसाट, परिषेक मोहन मेस्त्री, शेख सर, प्रकाश म्हाडेश्वर, शार्दुल घुर्ये, संदेश किंजवडेकर सर, सौ कल्पना पडते, मारुती मंदिर देवस्थान कमिटीचे मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, दिनार पडते, सुमेध साळवी, चेतन पडते, नितीश म्हाडेश्वर, सुमेश काणेकर, सागर मठकर, संदेश पडते, नागेश नेमळेकर, गोट्या कोरगावकर, राजेश म्हाडेश्वर,निवेदक बादल चौधरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page