वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यातील तिथवली या गावी येथील बौद्ध विकास मंडळ तिथवली व केळवली येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बापू तांबे यांच्या सौजन्याने या गावातील १० वी / १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पंचक्रोशितील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान आणि शैक्षणिक वस्तूंचे वाटप कार्यक्रम येथील परिश्रम बुद्धविहार तिथवली येथे नुकताच सम्पन्न झाला

सुधीर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुभाष बापू तांबे, निवृत्त पोलिस कॉन्स्टेबल गुणाजी तांबे,वैभववाडी तालुका माजी सभापती बाळा हरयाण, बिल्डर्स विजय तावडे, तिथवली सरपंच सुरेश हरयाण, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष हरयाण, दिर्बादेवी सोसायटी चेअरमन ब्रम्हा हरयाण, ग्रा प सदस्य रोहीण कुडाळकर, आरोग्य सेवक गौर खेडे, महादेव हरयाण, विश्वनाथ तांबे, प्रदीप पवार, निलेश तांबे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष तांबे यांनी त्यांचे दिवंगत वडील कालकथीत बापू भागोजी तांबे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंचक्रोशीतील १० गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पढील शिक्षणासाठी ११००/- रुपये शिष्यवृत्ती, वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तर बौद्ध विकास मंडळ तिथवली च्या वतीने १०वी / १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच तिथवली गावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते व दाते सुभाष तांबे म्हणाले ” विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आजच्या स्पर्धेच्या युगात टीकताना स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी श्रम, जिद्द आणि चिकाटी असणे गरजेचे असल्याचे सांगितले.”

यावेळी मार्गदर्शन करताना माजी सभापती बाळा हरयाण म्हणाले तिथवली बौद्ध विकास मंडळाचे कोणतेही कार्यक्रम समजाला दिशा देणारे असेच असतात. आमच्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्याना प्रोस्थाहन देऊन त्यांचा उस्थाह वाढवण्याचे काम या मंडळाने केलेले असल्याने या मंडळाचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप तांबे, मोतीचरण तांबे, सतीश तांबे, गंगाराम तांबे यांनी सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार तिथवली बौद्ध विकास मंडळाचे सचिव अजय तांबे गुरुजी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page