वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील वजराट श्री गिरेश्वर सहकारी सेवा सोसायटी लि. वजराट च्या आज शुक्रवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री गिरेश्वर सातेरी पंचायतन समृद्धी सहकार पॅनलने श्री गिरेश्वर सातेरी उत्कर्ष गाव सहकार पॅनलचा पराभव करीत सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केले.श्री गिरेश्वर सातेरी पंचायतन समृद्धी सहकार पॅनल वजराट चे ६ उमेदवार निवडून आले.तर २ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.श्री गिरेश्वर सातेरी उत्कर्ष गाव सहकार पॅनलचे ५ उमेदवार निवडून आले.श्री गिरेश्वर सातेरी पंचायतन समृद्धी सहकार पॅनलचे सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटातून मनोहर महादेव परब,वसंत लवू पेडणेकर, जगदीश आनंद सावंत भोसले,दत्तात्रय (अण्णा) भास्कर वजराटकर ,महिला प्रतिनिधी मधून अपर्णा आनंद करंगुटकर,इतर मागास प्रतिनिधी मधून रमाकांत विनायक सोनसुरकर हे ६ उमेदवार विजयी झाले.तर
अनुसूचित जाती जमाती मधून
हरिश्चंद्र लक्ष्मण वजराटकर बिनविरोध ,भटक्या विमुक्त जाती जमाती मधून गंगाराम रामा खरात हे बिनविरोध निवडून आले आहेत.
श्री गिरेश्वर सातेरी उत्कर्ष गाव सहकार पॅनल मधून सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मधून विकास नारायण चव्हाण,नितीन यशवंत परब,वसंत पुंडलिक परब,सत्यवान सिताराम सावंत,
महिला प्रतिनिधी मधून मोहिनी मदन परब हे ५ उमेदवार विजयी झाले.वजराट ग्रामपंचायत सभागृह येथे ही निवडणूक संपन्न झाली.त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.
यावेळी एकूण ३०२ सभासदांनी मतदान केले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एल.कावले यांनी काम पाहिले.यावेळी विजयी उमेदवार यांचे श्री गिरेश्वर सोसायटीचे चेअरमन बाबुराव उर्फ ताता परब,शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,बेळगावचे माजी नगरसेवक किरण परब,बेळगाव सिंधु को.ऑप. क्रेडिट सोसायटी व्हाईस चेअरमन संजय परब, आडेली सोसायटीचे चेअरमन प्रकाश गडेकर, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी आदींनी पुष्पहार घालून अभिनंदन केले.यावेळी माजी सभापती सुचिता वजराटकर,राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे,माजी सरपंच अनंत परब,ग्रा.पं. सदस्य प्रेमानंद भोसले, मनिषा कांदे,आनंद पुराणिक, संदिप पेडणेकर, शेखर परब, साईप्रसाद केरकर, दिगंबर पेडणेकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट,संतोष सोनसुरकर, एस.के.परब,मंगेश परब,शेखर परब,आबा परब,चंद्रकांत सोनसुरकर,आपा परब आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
