वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यात ९ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड नाबरवाडी येथील घर नंबर २०१ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर चा परिसर, रेडी-नागोळे येथेील घर नंबर ६७ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर चा परिसर, कांबळेवीर येथील घर नंबर ८५८ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर चा परिसर २४ जानेवारी पर्यंत कंटेन्मेंट झोन. रेडी गावतळे येथील घर नंबर ११२४ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर चा परिसर, आवेरा तळेकरवाडी येथील घर नंबर ७०५ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर चा परिसर, आडेली- खुटवळवाडी, येथील घर नंबर ३०६ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर चा परिसर, दाभोली-ख्रिश्चनवाडी, येथील घर नंबर २६३ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर चा परिसर, २५ जानेवारी पर्यंत कंटेन्मेंट झोन. शिरोडा-हरीजनवाडी येथील घर नंबर १५९ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर चा परिसर, शिरोडा-हरीजनवाडी येथील घर नंबर १४३ चे सभोवतालचा वर्तुळाकार २५ मीटर चा परिसर २६ जानेवारी पर्यंत कंटेन्मेंट झोन  जाहिर करण्यात आले आहेत.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व आस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल, वेंगुर्ला तालुक्यातील व त्यांच्या आजुबाजूचा परिसर व कोरोना बाधीत क्षेत्र म्हणुन घोषित केलेल्या सर्व गावे, वाड्यायामधील सर्व शासकीय कार्यालय,सार्वजनिक ठिकाणे येथे लेखी नोटीस लावून व दवंडी देवून संबंधित,तलाठी,गामसेवक व पोलीस पाटील यांनी प्रसिध्दी द्यावी. स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक,विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांचे वास्तव्यास मुळ ठिकाणी स्थलांतर करण्यास परवानगी दिली असेल तरी कोरोना विषाणू बाधित क्षेत्रातून अशा व्यक्तींना स्थलांतरणास परवानगी राहणार नाही. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशांत पानवेकर, उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page