कणकवली /-
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा बँक उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच नवनिर्वाचित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना देखील विनोद तावडे व रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँक निश्चितपणे देशात आपला कामाचा ठसा उमटवेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची सांगड घालत बँक शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी विशेष प्रयत्न करेल, असा विश्वासही विनोद तावडे व रवींद्र चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केला.