कणकवली /-

कणकवली शहरातील उद्योजक, व्यावसायीक नीलेश नरहरी गोवेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोवेकर यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी गोवेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. नीलेश गोवेकर हे १९८०-१९८५ दरम्यान ते सिंधुदुर्ग शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी कार्यरत असलेल्या कै.नरहरी उर्फ माई गोवेकर यांचे सुपुत्र आहेत. कणकवलीत राष्ट्रवादी संघटना वाढीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे गोवेकर यांनी सांगितले.

प्रवेशावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा सचिव रुपेश जाधव, जिल्हा बँक संचालक आर. टी. मर्गज, नगरसेवक अबीद नाईक, निखिल गोवेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गोवेकर यांच्याबरोबरच अविनाश चव्हाण, सचिन चिंदरकर,आतीश कांदळगावकर, समीर वाळवे, अमोल मोर्वेकर, उमेश मोर्वेकर, अक्षय खरात, संतोष मांजरेकर, शंकर गोवेकर, बसप्पा मोदीगौडा, सुहास मुणगेकर महादेव वाळवे आ राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे नीलेश गोवेकर यांनी सांगितले.

शिवसेनेच्या उगमकाळात भाई गोवेकर यांनी सिंधुदुर्गात शिवसेना रुजवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. माई गोवेकर यांनी स्टेट बँकेत कामाला असताना अनेकांना स्पर्धा परीक्षा व व्यवसायांसाठीही मार्गदर्शनही केले. त्यानंतर त्यांचे मुलगे नीलेश गोवेकर यांनी बिल्डर्स व इतर व्यवसायात जम

बसवला.

नीलेश गोवेकर हे भंडारी समाज संघटनेतही कार्यरत आहेत. युवा भंडारी समाज संघटनेचे ते जिल्हा उपाध्यक्षही आहेत. कोविड काळात गरजूंना मदत, निराधार वृद्धाश्रमांना मदत आदी सामाजिक कार्यातही गोवेकर यांनी कायम पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page