You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हाभंडारी महासंघाच्या वतीने भालचंद्र मसुरकर यांना श्रद्धांजली..

सिंधुदुर्ग जिल्हाभंडारी महासंघाच्या वतीने भालचंद्र मसुरकर यांना श्रद्धांजली..

कुडाळ /-

कणकवली तालुका भंडारी ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हा सदस्य श्री. भालचंद्र मसुरकर यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.त्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी संघाच्या जनरल मीटिंग मद्धे त्यांना महासंघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री.अतुल बंगे यांनी सांगितले की मसुरकर यांच्या जाण्याने भंडारी समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे.यावेळी जिल्हा सचिव राजू गवंडे , कार्याध्यक्ष रमण वायंगणकर , उपाध्यक्ष सुनील नाईक ,मामा माडये ,लक्ष्मीकांत मुंडीये ,निलेश गोवेकर, समील जळवी,प्रकाश पावसकर ,एकनाथ पिंगुळकर ,काळवे गुरुजी,श्री.मोबारकर ,हेमंत करंगुटकर ,एकनाथ टेमकर ,शरद पावसकर ,श्री.मुणगेकर ,श्री.वैद्य,सत्यवान ,साटेलकर ,महासंघाचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..