कुडाळ /-
इयत्ता बारावीच्या 1985- 86 तर्फे पाट हायस्कूल साठी झेरॉक्स मशीन भेट देण्यात आली. यावेळी संस्था पदाधिकारी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी चे पदाधिकारी श्री दिगंबर सामंत ( कार्यवाह)श्री. देवदत्त साळगावकर श्री. सुधीर ठाकूर. मुख्याध्यापक श्री कोरे शामराव श्री. राजन हंजनकर .पर्यवेक्षक. श्री .बाळा गोसावी यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.माजी विद्यार्थ्यांमधील श्री ,मोहन परब (भारतीय सैन्यदल)व्यासपिठावर उपस्थित होते.यावेळी श्री .सामंत सर यांनी संस्थेच्या वतीने मनोगत व्यक्त केले. झेरॉक्स मशीन ही आज काळाची गरज झाली आहे .डिजिटल च्या युगात या मशीन चा मोठा उपयोग होतो. काळाची पावले ओळखून शिक्षण क्षेत्रातही बदल होत आहे. त्याबरोबर आपणही बदलत राहिले पाहिजे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी श्री . मोहन परब ,श्री. दाजी गोसावी, श्री .प्रदीप प्रभू ,श्री मोहन कोनकर, श्री .विठ्ठल तेली, श्री ,मिलिंद निर्गुण, श्रीम. मनिषा पाटकर , श्री. निलेश कुबल श्री. राजेंद्र देसाई ,श्री .गोविंद येरागी .श्री अनिल बागवे. श्रीम.सुजता कोचरेकर.श्री सत्यवान खोर्जुवेकर, श्री. पांडुरंग सारंग हे माजी विद्यार्थी विद्यालयात उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री .कोरे सर यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ जान्हवी पडते यांनी केले .आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री राजन हंजनकर यांनी केले.
