मुंबई /-

यंदा गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भारतीय जनता पक्षाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. आमदार नितेश राणेंनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. खास बात म्हणजे हा प्रवास मोफत असला तरी त्यासाठी आरक्षण असणं आवश्यक असणार आहे.

प्रतिवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो. मात्र यंदा आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. खासदार नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे जाहीर आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page