कुडाळ /-

गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील होमियोपॅथिक डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक आणि पत्रकार बंधु यांच्या कडून कोविड काळात कंत्राटी भर्ती मध्ये इतर जिल्ह्यांप्रमाणे होमियोपॅथिक डॉक्टरांना संधी द्यावी अशी सातत्याने मागणी होत होती.जिल्ह्यात जास्त संख्येत असलेल्या होमियोपॅथिक डॉक्टर्स ना शासकीय सेवेत संधी देऊन कोविड काळात वैद्यकीय मनुष्यबळ वाढवून आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास मदतच होणार आहे.

महाराष्ट्रभरात प्रशासकीय अडचणी असूनही जवळपास अडीच हजार होम. डॉक्टर्स कोविड कंत्राटी सेवा देत आहेत. महानगरपालिका क्षेत्रात विशेषतः मुंबई मध्ये होम.डॉ.नी शासकीय आरोग्य व्यवस्थेला चांगली साथ दिली आहे याचे कौतुकही अनेक जणांकडून होत आहे.जिल्ह्यात कोविड कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी या दहा जागांसाठी ३५अर्ज आले. पैकी पहिल्या १०जणांना नियुक्ती पत्र देण्यात आली तर उर्वरित पैकी १०जणांची प्रतीक्षा यादी करण्यात आली आहे त्यांनाही येत्या काही दिवसांत संधी देण्याचे आश्वासन मान.पालकमंत्री श्री.उदय सामंत, खासदार श्री.विनायकजी राऊत साहेब यांनी दिले आहे.निवड झालेले होम.डॉ. हे अनुभवी आणि सामाजिक भान असलेले डॉक्टर्स आहेत त्यांचा फायदा हा कोविड रुग्णसेवेत नक्कीच होणार आहे.

होमियोपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ.प्रविण सावंत, डॉ.अभिनंदन मालंडकर, डॉ.शरद काळसेकर, डॉ.सि.आर.परब, डॉ.गुरू गणपत्ये, डॉ.वंदन वेंगुर्लेकर व आधार फाउंडेशन चे अध्यक्ष श्री.नंदन वेंगुर्लेकर यांनी खासदार श्री.विनायकजी राउत, पालकमंत्री ना.उदयजी सामंत, आमदार श्री.वैभवजी नाईक यांची भेट घेऊन आभार मानले. तसेच मा.जिल्हाधिकारी,श्रीमती.के.मंजुलक्ष्मी व अप्पर जिल्हाधिकारी श्री.मंगेश जोशी यांचेही आभार मानले.

तसेच नेहमी होमियोपॅथिक डॉक्टर्सच्या प्रश्न सोडवण्यात मदत करणारे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव श्री.काका कुडाळकर, शिवसेना युवा नेते श्री.संदेश पारकर, जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते व जि.प.गटनेते श्री.नागेंद्र परब यांचेही आभार होमियोपॅथिक डॉक्टर्सनी मानले.जिल्ह्यात आयुष वैद्यकीय अधिकारी कोविड काळात अतिशय उत्तम काम करत आहेत, त्यात होम.डॉक्टर्स ना संधी दिल्या मुळे आयुष वैद्यकीय अधिकारी यांच्या रूपाने येत्या काळात जिल्ह्याला वैद्यकीय मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page