वेंगुर्ले तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ..

वेंगुर्ले तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज शुक्रवारी तब्बल ८५ कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.यामध्ये शहर एरियात १८ व ग्रामीण भागात ६७ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.तालुक्यातील सक्रिय पॉझिटिव्ह संख्या ४०७ इतकी झाली आहे.आज शुक्रवारी आलेल्या अहवालात उभादांडा १०,भेंडमळा १,वायंगणी १,खानोली १,मठ १४,आडेली २,वेतोरे पालकरवाडी ५,आरवली ६,रेडी ८,तुळस ३,पेंडूर १,खवणे ५,चिपी १,केळुस १,परुळे १,म्हापण १,शिरोडा ६ असे एकूण ६७ आणि वेंगुर्ले शहर एरियात १८ व्यक्ती अशा एकूण ८५ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

अभिप्राय द्या..