मसुरे /-
मुणगे गावचे दानशूर व्यक्तीमत्व उद्योजक नंदकुमार मुणगेकर यांनी मुणगे ग्रामपंचायतीस तीन थर्मलगन,तीन आँक्सीमीटर आणि सँनीटायझर आदी साहित्य नुकतेच भेट दिले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक तपासणी करिता ग्रामपंचायतीकडे स्वत: संपर्क साधून सध्यस्थितीत ग्रामपंचायत ची गरज ओळखून मुणगे गावचे सुपुत्र व मुंबई येथील उद्योजक नंदकुमार मुणगेकर यांनी हे साहित्य भेट दिले आहे. सदर साहित्य श्री. नंदकुमार मुणगेकर यांचे जेष्ठ बंधू जयप्रकाश अनंत मुणगेकर यानी सरपंच सौ. साक्षी गुरव यांच्याकडे सुपूर्द केले.श्री मुणगेकर यानी दिलेल्या देणगीबद्दल संरपंच सौ साक्षी गुरव यानी सांगितले की, श्री मुणगेकर यांचे नेहमीच ग्रामपंचायतीस सहकार्य असते. गावचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मिळालेल्या साहित्याचा उपयोग होणार आहे. त्यांच्या या देणगी बद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. यावेळी उपसरपंच धर्माजी आडकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मुणगेकर, स़जय घाडी, प्रमोद सावंत, अंजली सावंत, परिता नाटेकर, रविना मालंडकर, ग्रामसेवक श्री कुबल, माजी सरपंच अस्मिता पेडणेकर, माजी ग्राम सदस्य दिगंबर पेडणेकर, मनोज सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष पुजारे, दादा वळंजू आदी उपस्थित होते.